सर्व प्रथम सर्व पाथर्डीकरांना मी प्रदिप एकशिंगे व प्रशांत वाळके यांचा नमस्कार ,

मित्रानो आम्ही आपणासाठी pathardicity.in या नावाने एक नवीन वेब पोर्टल (वेबसाईट ) या नावाने बनवली आहे. Pathardi Business Directory या नावाने यावरती आपणास सर्व माहिती पहावयास मिळणार आहे.हि वेबसाईट बनविण्यामागचा आमचा मूळ उद्देश म्हणजे पाथर्डीमधील व्यापारी व ग्राहक यांच्यामधील दुरावा कमी करणे हा होय.आपल्या काही व्यापारी बांधवाना वाटते कि आमचे भरपूर जुने व्यवहार आहेत आम्हाला याचा काय उपयोग परंतु आम्हाला त्यांना सागण्यास आनंद होईल आपण मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डीजिटल इंडिया कडे वाटचाल करत आहोत त्यामुळे भरपूर जन आपल्या मोबाईल वरती इंटरनेटचा वापर करतात हे सर्वजण आपल्या व्यवसायाची माहिती घरबसल्या त्यांच्या मोबाईलमध्ये पाहू शकतील .त्यामुळे पाथर्डी शहरामधील सर्व दुकाने यांना मोबाईलमध्ये पहावयास मिळतील कि जि सर्व माहिती आम्ही त्यांच्या विभाजनानुसार जसे कि होटेल,किराणा दुकान,कापड दुकान,सोनार व इतर सर्व छोटे मोठे दुकानदार ,दुकानाचे नाव,मालकाचे नाव,पत्ता ,कामकाजाची वेळ व मोबाईल नंबर दिलेला आहे यामुळे दुकानदार व ग्राहक यामधील दुरावा कमी होण्यास मदत होईल .सर्वसामान्य ग्राहक प्रत्यक्ष दुकानदारांशी संपर्क करून त्याला हव्या असलेल्या वस्तूची किंवा सेवेची चौकशी करू शकतात जरी तो ग्राहक बांधव आपल्या नोकरीमुळे देशाच्या कोणत्याही भागात असला तरी तो हि माहिती पाहू शकतो.

याचप्रमाणे सर्वसामन्यांना कोणतेही सरकारी काम करावयाचे असल्यास त्यासाठी अनेकवेळा चकरा माराव्या लागतात, कधी कधी कर्मचारी भेटत नाही त्यामुळे आपला विनाकारण वेळ वाया जातो या सर्व बाबींचा विचार करून आम्ही वेबसाईटवरील Important Contact या मेनूमध्ये सर्व सरकारी कर्मचारी जसे कि तलाठी,ग्रामसेवक,पत्रकार व इतर अनेक कर्मचार्‍यांचे नाव ,पद ,मोबाईल नंबर दिले आहेत के ज्यामुळे आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्क करून आपल्या शंकेचे निरासारण करून घेऊ शकता .

आपल्याला भरपूर वेळेस बसने प्रवास करावा लागतो परंतु आपल्याला आगर डेपोचा फोन नंबर माहित नसतो किंवा बस वेळपत्रक माहित नसते त्यामुळे भरपूर वेळेस बस आगरामध्ये विनाकारण जास्त वेळ बसावे लागते याचाच विचार करून आम्ही वेबसाईटवरती बस वेळापत्रक दिलेले आहे ,की ज्यामुळे आपल्याला त्याचा उपयोग होईल व विनाकारण बस आगरामध्ये बसावे लागणार नाही .पाथर्डी तालुक्यात असलेल्या सर्व तीर्थस्थळांची माहिती आम्ही दिलेली आहे.

पाथर्डीमधील खोली मालकांना आणखी सुविधा आम्ही पुरवत आहोत ज्या खोली मालकांना आपली रूम / खोली भाडे तत्त्वावर द्यावयाची आहे ते त्यांची माहिती स्वतः New Business Registration मध्ये Room on Rent या मेन्यूमध्ये टाकू शकता किंवा आम्हाला फोन करून सांगू शकता की जेणेकरून ज्यांना रूम / खोली हवी असल्यास ते वेबसाईटवरती पाहू शकता व त्यांना त्यासाठी धावपळ करण्याची गरज पडणार नाही यामुळे खोली भाडयाने देणाऱ्यासाठी व घेणाऱ्यासाठी दोघांनाही भरपूर उपयोग होणार आहे.

याचबरोबर pathardicity.in या वेबसाईटवरती आपल्या व्यावासायिक बांधवासाठी आम्ही त्यांना त्यांच्या व्यावसायाची जाहिरात करण्याची सुविधा चालू करत आहोत यामध्ये आपण दिलेली जाहिरात भारताच्या सर्व भागामध्ये पहावयास मिळेल जे आपले पाथर्डीकर बंधु नोकरीनिम्मित परगावी असतील त्यांनापण हि जाहिरात पहावयास मिळणार आहे यामुळे आपला व्यवसाय वाढण्यास आणखी मदत मिळणार आहे.

पाथर्डी तालुक्यातील तीर्थस्थळे ,शैक्षनिक संस्था ,हॉटेल्स ,दुध शीतकरण केंद्र छोटे मोठे कारखाने ज्यांना आपल्या व्यावसायाची स्वतंत्र वेबसाईट (वेब पोर्टल) बनवायचे असेल त्यांना हवी असेल त्याप्रमाणे वेबसाईट बनवून (Design) करून मिळेल.

वरील दिलेल्या माहितीमध्ये कसलीही कमतरता असल्यास किंवा याबद्दल आपल्याला काही नवीन कल्पना असतील किंवा कोणतीही माहिती की जी आपणास उपयोगी आहे ते आम्हाला कळवा आम्ही जरूर आम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे प्रयत्न करून ती माहिती आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू.

Prashant Walke
Prashant Walke
Prashant Walke
Pradip Ekashinge

धन्यवाद !!!!!!!!